Image 1

ग्रामपंचायत फोंडाघाट

पंचायत समिती कणकवली, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग

महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत उपक्रम

ISO 9001:2015 Certified

ISO
📞 ग्राहक सेवा / हेल्पलाईन : 9975797462
Chhatrapati Shivaji Maharaj Tukdoji Maharaj Gadge Maharaj

फोंडाघाट ग्रामपंचायत विकास कामे

गावाच्या प्रगतीचा अहवाल

💊 आरोग्य व पोषण सुविधा (Health & Nutrition Facilities)

• प्राथमिक आरोग्य उपकेंद्र विकास

इमारत बांधकाम/दुरुस्ती, औषधे उपलब्ध करणे, डॉक्टर किंवा आरोग्य सेवकांची उपलब्धता, आपत्कालीन सेवा.

• लसीकरण व आरोग्य शिबिरे

बाललसीकरण, प्रसूतीपूर्व/प्रसूतीनंतर तपासण्या, आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, डेंग्यू/मलेरिया प्रतिबंधक फवारणी.

• पोषण कार्यक्रम

अंगणवाड्यांची उभारणी/दुरुस्ती, लहान मुलांसाठी पोषण आहार, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी आरोग्य व पोषण मार्गदर्शन.

🛣️ पायाभूत सुविधा विकास (Infrastructure Development)

• रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्ती

गावातील मुख्य रस्ते, आंतरिक गल्ली रस्ते व शेतमार्ग सिमेंट / डांबरी स्वरूपात बांधणे. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून योग्य उतार, साइड पट्ट्या तयार करणे आणि तुटके, खड्डे असलेले रस्ते दुरुस्त करणे.

• सार्वजनिक शौचालय बांधकाम

गावातील नागरिकांसाठी स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम.

• स्ट्रीट लाइटिंग प्रणाली

LED स्ट्रीट लाईट बसवणे, जुन्या लाईटचे बदलणे, खांबांची दुरुस्ती, तसेच लाईट कंट्रोल पॅनल बसवून वीज बचत करणे.

• सार्वजनिक बांधकामे

समुदाय भवन, सभागृह, ग्रामपंचायत कार्यालय, देवळे व स्मशानभूमी परिसराचे विकास कामे.

🚰 पाणीपुरवठा व स्वच्छता (Water Supply & Sanitation)

• सार्वजनिक विहिरी वरील झाकणे

अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक विहिरींवर सुरक्षित झाकण बसविणे.

• पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

नवीन पाईपलाईन टाकणे, जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती, ओव्हरहेड टाकीचे बांधकाम, बोरवेल/विहीर स्वच्छता व मोटार पंपाची देखभाल.

• जलजीवन मिशनअंतर्गत कामे

प्रत्येक घराला नळजोडणी देणे, स्मार्ट मीटर बसवणे, पाणी गुणवत्ता तपासणी करणे, पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवणे.

• स्वच्छता कार्यक्रम

गावभर कचरा संकलन वाहन व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन केंद्र (कचरा शेड), सार्वजनिक शौचालये, कचरा वर्गीकरण, स्वच्छता मोहिमा व प्लास्टिकमुक्त गाव अभियान.

🎓 शिक्षण व सामाजिक विकास (Education & Social Development)

• सार्वजनिक वाचनालय

गावातील नागरिकांसाठी वाचनाची व अभ्यासाची सोय उपलब्ध करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय स्थापन करणे.

• प्राथमिक शाळा रंगरंगोटी

शाळेचे वातावरण सुंदर व आकर्षक करण्यासाठी प्राथमिक शाळेची रंगरंगोटी करणे.

• शाळा विकास

शाळेची इमारत दुरुस्ती, वर्गखोली वाढवणे, संगणक कक्ष निर्माण, ग्रंथालय, शौचालये, पिण्याचे पाणी सुविधा.

• कौशल्य विकास कार्यक्रम

महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण, शिवणकला, संगणक प्रशिक्षण, रोजगाराभिमुख कार्यशाळा.

• सामाजिक उपक्रम

महिला व बालविकास योजना, दिव्यांगांसाठी सहाय्य, वृद्ध नागरिकांसाठी सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

🖥️डिजिटल व तांत्रिक सुधारणा (Digital & Administrative Improvements)

• अंगणवाडी रंगरंगोटी व डिजिटल

अंगणवाडी मध्ये रंगरंगोटी करून डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध करणे.

• ई-गव्हर्नन्स

ग्रामपंचायतची सर्व कामे ऑनलाइन करणे (प्रमाणपत्रे, कर, जन्म/मृत्यू नोंद), वेबसाईट तयार करणे.

• सुरक्षा व्यवस्था

सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सार्वजनिक ठिकाणी डिजिटल डिस्प्ले बोर्ड.

• माहिती पारदर्शकता

ग्रामसभेसाठी कागदपत्रे, खर्च, विकास कामांची माहिती फलकावर प्रदर्शित करणे.

🌾 कृषी व ग्रामीण विकास (Agriculture & Rural Development)

• अंगणवाडी सोलर युनिट

अंगणवाडी साठी वीज बचतीसाठी सोलर युनिट बसविणे.

• जलसंधारण कामे

कुन, शेततळे, पाणंद रस्ते, पाण्याची अडवणूक करण्यासाठी गाळ काढणे, छोटी-मोठी धरणे दुरुस्ती.

• शेतीसाठी सहाय्य

कृषी शिबिरे, तांत्रिक मार्गदर्शन, बियाणे/खत वितरण, कीड नियंत्रण प्रशिक्षण.

• पशुसंवर्धन

गायीशाळा, जनावरांच्या लसीकरण मोहीमा, चारा डेपो, पशुवैद्यकीय शिबिरे.

🌳 पर्यावरण संरक्षण (Environment Protection)

• सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

गावातील सांडपाणी व घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्थापन व्यवस्था करणे.

• वृक्षारोपण मोहिमा

गावातील रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक जागांवर, शाळा परिसरात वृक्षारोपण व त्यांचे संगोपन.

• स्वच्छ व हरित ग्राम प्रकल्प

पाण्याची बचत, नवीकरणीय ऊर्जा (सौरऊर्जा), पावसाचे पाणी साठवणे, प्लास्टिकमुक्त गाव प्रकल्प.

🛠️ सन २०२२ ते २०२५ या कालावधीतील इतर विकास कामे

या कामांसाठी पिण्याचे पाणी निधी, रस्ते बांधकाम निधी, वृक्ष लागवड निधी, घरकुल योजना निधी, व्यक्तीक शौचालय निधी, अंगणवाडीचे बांधकाम निधी, नैसर्गिक आपत्तीने पडलेल्यांना मदत निधी, पशुवैद्यकीय दवाखाना निधी, नाली बांधकाम निधी, बंधारे निधी, पांदन रस्ता निधी, आणि इतर कामे केली आहेत. या कामांना विविध निधीतून (उदा. खनिज निधी, दलित वस्ती निधी, १५ वित्त आयोग निधी, सामान्य फंड निधी, जिल्हा निधी, सेस फंड निधी, नागरी विकास निधी, सुवर्ण जयंती योजना निधी) निधी पुरवण्यात आला आहे.

मुख्य कामांची यादी: